प्रोझोन मॉलमधील दुकाने फोडली

Foto

छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः प्रोझोन मॉल मधील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी ६ लाख ६६ हजार २९९ रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम रावसाहेब तुपे रा. संघर्षनगर मुकूंदवाडी व त्याचे साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. मॅनेजर सुनील किसनराव काटे रा. रेणुकानगर शिवाजीनगर गारखेडा परिसर यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार २६ जानेवारी रोजी रात्री प्रोझोन मॉलमधील ग्राऊंड फ्लोअरला असलेले शॉप क्र. ७२ व ७३ हे स्केचर्स दुकान चोरट्यांनी फोडले. 
गल्ल्यातील ३ लाख ७५ हजार ५०६ रूपये रोख, २९ हजार २९३ रूपयांचे साहित्य असा ४ लाख ४ हजार ७९९ रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. तर पहिल्या मजल्यावरील सिझर्स क्रेझी शा दुकानाचे शटर उचकटून २ लाख ६१ हजार ५०० रूपये रोख व लॅपटॉप असा ६ लाख ६६ हजार २९९ रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.